हिंजवडीत दुचाकीस्वाराला लुटले

0
317

हिंजवडी, दि. २९ (पीसीबी) – दुचाकीवरून जाणा-या तरुणाला रिक्षातून आलेल्या चार जणांनी लुटले. तरुणांकडून पैसे, मोबाईल आणि दुचाकी काढून चोरट्यांनी पोबारा केला. ही घटना सोमवारी (दि. 27) रात्री साडेअकरा वाजता घडली.

मकरंद दत्तात्रय पवार (वय 30, रा. किरकिटवाडी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. 28) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोमवारी रात्री त्यांच्या दुचाकीवरून (एम पी 04 / एस एक्स 3199) मुंबई-बेंगलोर महामार्गावरून जात होते. ते सुसखिंडीत आले असता चार जण रिक्षातून आले. तू इथे का थांबला असे म्हणत चोरट्यांनी फिर्यादी यांच्या खिशातून पाच हजार रुपये रोख आणि दोन हजारांचा मोबाईल फोन काढून घेतला. एकाने कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादीकडून त्यांच्या दुचाकीची चावी घेतली. चोरटे रोख रक्कम, मोबाईल फोन आणि ३० हजारांची दुचाकी घेऊन पळून गेले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.