हिंजवडीतून मेट्रो लाईन तीन चे तब्बल साडे तीन लाखांचे साहित्य चोरीला

0
175

वाकड, दि. २७ (पीसीबी) – हिंजवडीतील शिवाजी चौकी येथून हिंजवडी वाकड रोडवरील मेट्रोचे तब्ब्ल साडे तीन लाखांचे साहित्य चोरीला गेले आहे. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सारा प्रकार 29 डिसेंबर 2023 ते 29 जानेवारी 2024 या एक वर्षाच्या कालावधीत घडला आहे.

याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात सुरक्षा रक्षक श्रीकृष्ण माधवराव खपके (वय 24 रा.म्हाळुंगे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे,

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे मेट्रो लाईन तीन च्या पीएमआर 5 विप्रो चौक ते पीएमआर 7 शिवाजी चौकी या लाईनचे तब्बल 3 लाख 60 हजार 605 रुपयांचे साहित्य चोरीला गेले आहे, हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.