हाय टेशन विजेचा शॉक लागून बांधकाम मजुरांचा मृत्यू

0
158
  • महापालिका प्रशासन, महावितरणचे सोयिस्कर दुर्लक्ष

चिंचवड, दि.११ – पिंपरी चिंचवड महानगरपालिका ब क्षत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील बळवंत कॉलनी, चिंचवडे नगर चिंचवड येथे एक २२ वर्षीय बांधकाम मजुरांचा बांधकाम काम करत असताना सकाळी १२ च्या सुमारास हायटेन्शनचा विजेचा शॉक लागुन जागीच मृत्यू झाला. परिसरात अशा प्रकारची असंख्य अवैध बांधकामे सुरू असताना प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे.

ब प्रभाग क्षेञीय आधिकारी,बीट निरिक्षक,अनधिकृत बांधकाम विभाग अधिकारी,अनधिकृत बांधकाम धारक, अनधिकृत करणारे बांधकाम ठेकेदार,व संबंधित अधिकारी यांचा वर गंभीर स्वरूपाचे गुन्हा दाखल करण्यात यावा.अशी मागणी सुनील जावळे, महासचिव वंचीत बहुजन युवा आघाडी यांनी केली आहे.

ब प्रभाग क्षेञीय अधिकारी व संबधीत आधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे एका गरीब कुटुंबातील घरातील करता धरता तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त साहेब संबंधित अनधिकृत बांधकाम अतिक्रमण विभाग यांच्यावर कारवाई करतील का ? असा सवाल वंचीतचे सुनील जावळे यांनी उपस्थित केला आहे.

संबंधितावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा जनअंदोलन उभारण्यात येईल,असा इशारा वंचीतचे जावळे यांनी दिला आहे. लवकरात लवकर गुन्हा दाखल करुन संबधीत अधिकार्‍यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सुनील जावळे यांनी पोलीस आयुक्त व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.