हायवाच्या धडकेत दोघांचा मृत्यू

0
101

पिंपरी, दि. 26 (पीसीबी) : हिट अँड रन सारखा प्रकार आज सकाळी पिंपरी येथील वल्लभनगर मध्ये घडला.दुचकीवरचा निष्पाप दोन तरुणांचा त्यात बळी गेला. सकाळी ११ वाजता अपघात झाला आणि डंपर चालक पळून गेला, पण सायंकाळ पर्यंत सापडला नाही.

हायवाने धडक दिल्याने दुचाकी वरील दोघांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 26) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास वल्लभनगर चौकात घडली. अविनाश व्यंकटेश सलवार (वय 20), रमेश अदीअप्पा म्हेत्रे (वय 20, दोघे रा. गांधीनगर, पिंपरी) अशी मृत्यू झालेल्या दुचाकीस्वारांची नावे आहेत.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश व रमेश हे पिंपरी येथे एका शोरूममध्ये कामाला होते. ते मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे नाश्ता करण्यासाठी वल्ल्भनगर येथे निघाले होते. दरम्यान एसटी स्थानकाजवळ आले असता एका भरधाव हायवाने त्यांना उडवले. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले.

दरम्यान अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला. त्याचा शोध सुरु असल्याचे संत तुकारामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार यांनी सांगितले. याबाबत रात्री उशिरापर्यंत संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.