हायवाखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
90

महाळुंगे, दि. 8 ऑगस्ट (पीसीबी) – भरधाव हायवाने एका दुचाकीला धडक दिली. हायवाच्या चाकाखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि. 7) सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास इंडुरन्स चौक ते एच पी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर महाळुंगे येथे घडला.

सीताराम सुरेश शिंदे (वय 25, रा. सिद्धीविनायक नेस्ट, मोहन नगर, तळेगाव दाभाडे) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे. याप्रकरणी सखाराम रंगनाथ सोळसे (वय 40, रा. इंदोरी, ता. मावळ) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हायवा (एमएच 14/जीयु 4224) चालक दिनेश हुरगुडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीताराम शिंदे नाणेकरवाडी येथे एका खासगी कंपनीत नोकरीस होते. ते बुधवारी काम संपल्यानंतर सायंकाळी त्यांच्या दुचाकीवरून घरी जात होते. इंडुरन्स चौक ते एच पी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर महाळुंगे येथे हायवाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात सीताराम शिंदे रस्त्यावर पडले. हायवाच्या चाकाखाली चिरडल्याने त्यांचा मृत्यू झाला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.