हायड्रोजनवर चालणाऱ्या देशाच्या पहिल्या प्रवासी बोटीला पुण्यातील इंधन घट

0
168

हायड्रोजनवर चालणाऱ्या देशाच्या पहिल्या प्रवासी बोटीला पुण्यातील इंधन घट बसविण्यात आले आहे. विज्ञान दिनी (ता.२९)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळच्या कोची शहरात तिचे अनावरण केले. केपीआयटी आणि राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने संयुक्तपणे हायड्रोजन इंधन घट विकसित केले आहे.

केरळच्या कोच्चिन शिपयार्डमध्ये बांधण्यात आलेलेल्या या हायड्रोजन बोटीसाठी देशभरातील संशोधन आणि औद्योगिक संस्थांनी सहभाग घेतला आहे. बोटीच्या इंजिनसाठी ऊर्जा पुरविणारा हायड्रोजन फ्युएल सेल एनसीएल, केपीआयटी आणि सीएसआयआर-सीरीने विकसित केला आहे. संशोधन संस्था आणि उद्योगांमधील भागीदारीचे हे सर्वोत्तम उदाहरण आहे.

केपीआयटीच्या वतीने विकसित होणारे हे हायड्रोजन इंधन घट संरक्षण, जलवाहतूक आणि वाहन उद्योगात उपयोगी येणार आहे. भारताची पहिली हायड्रोजनवर चालणारी बसही केपीआयटीच्या वतीने विकसित करण्यात आली होती. आता जलवाहतूक क्षेत्रातही केपीआयटीने स्वच्छ इंधनाचा पर्याय दिला आहे.