हातभट्टी दारू विक्रीसाठी आलेल्या एकास अटक

0
406

वाकड,दि.११(पीसीबी) – हातभट्टीची दारू विक्रीसाठी आलेल्या एकाला वाकड पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 42 हजार रुपये किमतीची हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 10) रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास काळाखडक, वाकड येथे करण्यात आली.

परमेश्वर उर्फ बाळू शंकर उबाळे (वय 41, रा. निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार अजय फल्ले यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उबाळे याने गावठी हातभट्टीची तयार दारू विक्रीसाठी आणली. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी उबाळे याला एका कार (एमएच 14/एई 5346)सह ताब्यात घेतले. कारमध्ये 42 हजार रुपये किमतीची दारू आढळून आली. पोलिसांनी दोन लाखांची कार आणि 42 हजारांची दारू असा मुद्देमाल जप्त केला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.