हातभट्टीची दारू तयार करून त्याची विक्री करणाऱ्या प्रसिद्ध गुन्हेगारवर पोलिसांची कारवाई

0
289

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – हातभट्टीची दारू तयार करून त्याची विक्री करणाऱ्या प्रसिद्ध गुन्हेगार किरण रमजान माचरे (वय 42, रा. भाटनगर, पिंपरी) याच्यावर पिंपरी चिंचवड पोलिसांनी स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.

आरोपी किरण हातभट्टीची दारू तयार करून त्याची विक्री करीत होता. याबाबत पिंपरी पोलिसांनी त्याच्यावर वारंवार कारवाई केली आहे. तसेच हातभट्टी दारू तयार करणे व त्याची विक्री करणे याबाबत त्याच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत.

त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव पिंपरी पोलिसांनी पोलीस आयुक्त विनायक कुमार चौबे यांच्याकडे सादर केला. त्यानुसार पोलीस आयुक्तांनी त्यास एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस आयुक्त विनायक कुमार चौबे यांनी आतापर्यंत एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेच्या पाच कारवाया केल्या आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, पोलीस उप आयुक्त विवेक पाटील, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे- 1) बाळासाहेब कोपनर, सहायक पोलीस आयुक्त (पिंपरी विभाग) सतिश कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने, सहायक फौजदार अनिल गायकवाड, पोलीस अंमलदार सचिन चव्हाण, कारभारी, ओंकार बंड यांनी केली आहे.