हातचलाखीने पळवली सोन्याची पाटली..

0
452

भोसरी, दि. २ (पीसीबी) – हातचलाखी करून दोन जणांनी महिलेच्या हातातील सोन्याची पाटली फसवणूक करून नेली. ही घटना बुधवारी (दि. १) सकाळी साडेआठ वाजता कासारवाडी येथे घडली.याप्रकरणी महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला बुधवारी सकाळी हास्ययोगा क्लास आणि मॉर्निंग वॉकसाठी सीतांगण गार्डन कासारवाडी येथे गेल्या होत्या. तिथून त्या सकाळी साडेआठ वाजता घरी जात होत्या. रेल्वे गेटजवळ कासारवाडी येथे आल्यानंतर एका दुचाकीवरून दोघेजण आले. त्यांनी फिर्यादी यांच्या हातातील ५० हजार रुपये किमतीची सोन्याची पाटली हातचलाखीने फसवणूक करून नेली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.