दि.१९(पीसीबी)-हाका मारी बाईच्या नावाची दहशत १९९० च्या दशकात अशी प्रतिकूल परिस्थितीत आणि वातावरण निर्माण झाले होते आणि २०२६ मध्ये पुन्हा (मोरवाडी सिग्नल) पिंपरी चिंचवड शहरात असे जाहिरात फलक / पोस्टर बॅनर लावून पिंपरी चिंचवड शहरात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशाप्रकारचे पोस्टर अंधश्रद्धा पसरवित असल्याने त्वरित कारवाईची मागणी सागर चरण यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
शहरात कोणत्याही माध्यमातून अनधिकृतपणे, वाईट हेतू किंवा चुकीच्या संदेशाद्वारे कोणतेही फलक /पोस्टर बॅनर लावले जाणार नाहीत आणि जर ते लावले गेले तर त्वरित कार्यवाही करणे आणि नियमांचे पालन सुनिश्चित करणे आकाशचिन्ह व परवाना विभागाचे काम आहे. महानगरपालिकेसमोरच अशा प्रतिकूल घटना घडत असतानाही, विभागाचे अधिकारी झोपले आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतो. असे पोस्टर बॅनर अनेक ठिकाणी लावले गेले असतील, त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून महानगरपालिका आणि पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून नियमानुसार त्वरित कार्यवाही करावी.
तसेच, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या अधिकारी यांच्या टाळाटाळ, निष्काळजीपणा व दुर्लक्षामुळे शहरातील अनेक भागात अजूनही असे प्रकरणाची पोस्टर्स बॅनर दिसतात. सर्व पोस्टर्स बॅनर त्वरित काढून टाकण्यासाठी आकाशचिन्ह व परवाना विभागाकडे पथक असूनही स्वतःहून वेळेत कोणतीही कार्यवाही केली जात नाही. ही दुर्दैवी बाब आहे. प्रचलित कायदा व “महाराष्ट्र मानव बलिदान आणि इतर अमानुष, अघोरी आणि अपमानजनक प्रथा आणि काळी जादू कायदा २०१३ हा अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायद्याचे उल्लंघन आहे.”
अंततः आपणास नम्र विनंती करतो की शहरांमध्ये हाका मारी बाईच्या नावाची पोस्टर बॅनर तात्काळ तात्काळ काढून टाकावेत आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे दोषी विरुद्ध योग्य ती कार्यवाही करावी.












































