हळदीच्‍या कार्यक्रमातून दागिन्‍यांची चोरी; महिलेला अटक

0
6

सांगवी, दि. 9 (पीसीबी)

लग्‍नाच्‍या हळदीचा कार्यक्रम सुरू असताना एका महिलेने एक लाख ६० हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. ते दागिने आपल्‍या मित्राकडे दिले. याप्रकरणी महिलेला अटक करण्‍यात आली आहे. ही घटना २१ डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजताच्‍या सुमारास नवी सांगवी येथे घडली.

अश्‍विनी तावरे (रा. उत्‍तमनगर, कोंढवा धावडे, पुणे) असे अटक केलेल्‍या आरोपीचे नाव आहे. तसेच तिचा मित्र प्रविण पवार (पूर्ण नाव, पत्‍ता माहिती नाही) यांच्‍या विरोधातही गुन्‍हा दाखल केला आहे. याबाबत ६२ वर्षीय महिलेने बुधवारी (दि. ८) याबाबत सांगवी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्‍या मुलाचे लग्‍न असल्‍याने त्‍याच्‍या हळदीचा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमाला आरोपी अश्‍विनी तावरे ही आली होती. आरोपी महिलेने फिर्यादी यांच्‍या मुलीच्‍या पर्समधून एक लाख ६० हजार रुपये किंमतीचे सोन्‍याचे दागिने चोरले. ते दागिने ते तिने आपला मित्र प्रवीण पवार याच्‍याकडे दिले. सांगवी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.