नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – दिल्लीत काही दिवासांपूर्वी मनीष नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली होती. मुस्लिम तरुणांनी त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या आरोपींना अटक केली आहे. मात्र, या हत्येच्याविरोधात विश्व हिंदू परिषदने दिल्लीतील रामलीला मैदानात एका रॅलीचं आयोजन केलं होते. यावेळी उपस्थित असलेल्या योगेश्वर आचार्य, महंत नवल किशोर दास यांनी प्रक्षोभक भाषणे केली आहेत. भाषणादरम्यान काही वक्त्यांनी ‘चुन चुन के मारेंगे’ची धमकी दिली. तर, एका वक्त्याने बंदूका घेण्याचे आवाहन उपस्थित समुदायाला केलं आहे.
योगेश्वर आचार्य यांनी बोलताना म्हटलं की, “हे आपल्याला एक-एक करुन निशाणा साधत आहेत. त्यामुळे आपल्यावर हल्ला करणाऱ्यांचे बोट नाहीतर, थेट हात कापा. गरज पडल्यास त्यांचा शिरच्छेदही करा. याने जास्तीत जास्त कारागृहात जावे लागेल. मात्र, यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे. चुन चुन के मारेंगे ( ओळख पटवून मारु ),” अशी धमकी योगेश्वर आचार्य यांनी दिली.
दुसरे वक्ते महंत नवल किशोर दास यांनी लोकांना बंदूका घेण्यास उकसवले आहे. “परवाने मिळवून बंदूका घ्या. जर, तुम्हाला परवाने मिळाले नाहीतर काळजी करू नका. जे तुम्हाला मारायला येणार आहेत, त्यांच्याकडे परवाने आहेत का? मग तुम्हाला परवान्याची गरज कशाला?,” असं उपस्थित समुदायाला महंत नवल किशोर दास यांनी म्हटलं.









































