हलगर्जीपणा बेतला जीवावर

0
49

पिंपरी, दि. 04 (पीसीबी) : वेगात वाहन चालवणे एका वृद्ध व्यक्तीच्या जीवावर बेतले. वाहनाचा अपघात होऊन वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पिंपरी येथे घडली. अरुण यशवंत वाघ (वय 70, रा. अजमेरा कॉम्प्लेक्स, पिंपरी) असे मृत्यू झालेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण वाघ यांनी त्यांची दुचाकी भरधाव वेगात चालवली. अजमेरा रोडने जात असताना उद्योग सोसायटी समोर त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. त्यामध्ये गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. तसेच दुचाकीचे मोठे नुकसान झाले. संत तुकाराम नगर पोलीस तपास करीत आहेत.