हरियाणामध्ये २५ लाख मतांची चोरी

0
4

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीतल्या इंदिरा गांधी भवनात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला त्यांनी H Files अर्थात हरियाणा फाईल्स असं नाव दिलं आहे. राहुल गांधी यांनी यावेळी हरियाणामध्ये २५ लाख मतांची चोरी झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या या आरोपामुळे आता आणखी एक नवा मुद्दा विरोधकांना मिळाला आहे.

निवडणूक भाजपाची उघडपणे मदत करतो आहे. हरियाणातल्या एका बूथवर एका महिलेचं नाव २२३ वेळा होतं. या महिलेने कितीवेळा मतदान केलं? याचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे. फेक फोटो असलेले १ लाख २४ हजार १७७ मतदार होते. मतदार यादीत एका महिलेने नऊ जागी मतदान केलं. निवडणूक आयोग या सगळ्याकडे दुर्लक्ष करतो आहे कारण त्यांना भाजपाला मदत करायची आहे.

ब्राझिलियन तरुणीचं 22 वेळ मतदान?
यानंतर राहुल गांधींनी एका तरुणीचा फोटो पत्रकार परिषदेत दाखवला. ते म्हणाले या मुलीने वेगवेगळ्यां नावांनी २२ ठिकाणी मतदान केलं आहे. या तरुणीने सीमा, संगीता, सरस्वती अशी नावं वापरुन मतदान केलं आहे. तसंच हरियाणाच्या मतदार यादीत ब्राझिलियन महिला काय करते आहे? असाही प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केला. हरियाणामध्ये दोन कोटी मतदार आहेत. मात्र २५ लाख मतांची चोरी झाली आहे. याचाच अर्थ आठ पैकी एक मतदार हा बनावट होता. त्यामुळेच काँग्रेसचा पराभव झाला असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

“हरियाणाच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदा असं झालं की, पोस्टल बॅलेट आणि प्रत्यक्ष मतांचा कल वेगवेगळा होता. यापूर्वी पोस्टल बॅलेट आणि वास्तविक मतं यांची दिशा एकसारखीच असायची. काँग्रेसचा २२ हजार ७७९ मतांनी पराभव झाला” असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये एका युवतीचा फोटो दाखवला. या फोटोसह वेगवेगळ्या नावाने २२ ठिकाणी मतदान केल्याचा आरोप केला. या युवतीने कुठे सीमा तर कुठे सरस्वती नावाने २२ वेळा मतदान केलं, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. ब्राझीलची महिला हरियाणाच्या वोटर लिस्टमध्ये काय करत होती? असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला. हरियाणात पाच कॅटेगरीमध्ये २५ लाख मतांची चोरी झाली असा आरोप राहुल गांधी यांनी केला.