हरितालिका व्रत पूजा मुहूर्त, तिथी आणि शुभ मुहूर्त

0
21

दि.५ (पीसीबी) – भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला हरितालिका व्रत केले जाते. हे व्रत विवाहिक स्त्रिया अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी, ऐश्वर्य आणि सुखसमृद्धीसाठी करतात. हा दिवस गणेश चतुर्थीच्या अधल्या दिवशी असतो. स्त्रिया मनोभावे पूजा करुन पतीच्या दीर्घायुष्याची पूजा करतात. देवी गौरीसह शिवलिंगाची पूजा करतात. यंदा हरितालिकेचे व्रत हे शुक्रवारी ६ सप्टेंबरला असणार आहे. या काळात अनेक कार्यक्रम देखील आयोजिले जातात. जाणून घेऊया पूजा मुहूर्त, तिथी आणि शुभ मुहूर्त

हरितालिका तृतीया शुभ संयोग
हरितालिका तृतीया ही भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला दरवर्षी असते. यंदा हा दिवस शुक्रवारी ६ सप्टेंबरला असणार आहे. या दिवशी रवियोग आणि बुधादित्य योग तयार होत आहे. तसेच कन्या राशीत चंद्र आणि शुक्राचा संयोग शुभ आणि फलदायी ठरेल. गुरु आणि चंद्राचा नवपंचम योग तयार होईल. या दिवशी दोन नक्षत्राचा संयोगही जुळून आला आहे. सकाळी हस्त नक्षत्र आणि संध्याकाळी चित्रा नक्षत्र असणार आहे. चतुर्थी तिथी आणि तृतीया तिथीचा संयोग असून हा अत्यंत शुभ मानण्यात आला आहे.

हरितालिका तृतीया मुहूर्त
भाद्रपद शुक्ल पक्षाची तृतीया तिथी ही गुरुवारी ५ सप्टेंबरला दुपारी १२ वाजून २२ मिनिटांनी सुरु होईल. तर ६ सप्टेंबरला दुपारी ३ वाजून १ मिनिटांनी संपेल. उदयतिथीनुसार हे व्रत ६ सप्टेंबरला केले जाईल. हरतालिका तृतीयेच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त सकाळी ६ वाजून २ मिनिटांपासून ते ८ वाजून ३२ मिनिटांपर्यंत असेल. २ तास ३१ मिनिटे हा सर्वोत्तम वेळ असेल. तसेच संध्याकाळी पूजेसाठी सर्वोत्तम वेळ ५ वाजून २६ मिनिटांपासून ते ६ वाजून ३६ मिनिटांपर्यंत असेल.

पूजा करताना म्हणा हा मंत्र
हरितालिका तृतीयेच्या दिवशी स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्नान करायला हवे. ‘मम उमामहेश्वर सायुज्यसिद्धये हरितालिकाव्रतमह करिष्ये।’ या मंत्राचा जप करून व्रत करण्याचा संकल्प करा.
पूजा घराला छान सजवून ‘ओम उमाय पार्वत्याय जगद्धात्रयै जगत्प्रतिस्थायै शांतिरूपिण्यै शिवाय व ब्रह्मरूपिण्यै नमः’ या मंत्राचा उच्चार करून पार्वतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करा.
‘माहेश्वराय’, ‘शांभवे’, ‘शूलपाणये’, ‘पिनाकधृषे’, ‘शिवाय’, ‘पाशुपतये’ आणि ‘महादेवाय नमः’ असा जप करून शिवाच्या मूर्तीची स्थापना करा.
त्यानंतर ‘देवी देवी उमे गौरी त्राही मां करुणानिधे । ममपराधः क्षान्तव्य भुक्तिमुक्तिप्रदा भव । नामजप करताना उपवास ठेवा आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडा.