हप्ता देण्यास नकार दिल्याने दुकानदारावर कोयत्याने वार

0
28

पिंपरी, दि. 5 (पीसीबी)
हप्ता देण्यास नकार दिल्याने सात जणांनी मिळून दुकानदार आणि दुकानातील कामगारांवर कोयत्याने वार केले. ही घटना शुक्रवारी (दि. ३) रात्री पिंपरी येथील प्रगती ऍक्सेसरीज या दुकानात घडली.

अनिल मधुकर बैतुले (वय ४९, रा. पिंपळे सौदागर) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आशिष पाल उर्फ कोयत्या आणि त्याचे सहा साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पिंपरी येथे प्रगती ऍक्सेसरीज नावाचे दुकान आहे. शुक्रवारी सायंकाळी आरोपी सर्वजण अनिल यांच्या दुकानात आले. त्यांनी अनिल यांच्याकडे हप्ता मागितला. अनिल यांनी हप्ता देण्यास नकार दिला. त्या कारणावरून आरोपींनी अनिल यांच्यावर कोयत्याने वार केले. तसेच अनिल यांच्या दुकानातील कामगार मोहम्मद जगीर मन्सुरी (वय २३, रा. काळेवाडी), श्रीराम गोवर्धन गौतम (वय २२, रा. पिंपरी) यांच्यावर देखील वार करून त्यांना जखमी केले. आरोपींनी कोयते हवेत नाचवून दहशत निर्माण केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.