हटकले म्हणून सिमेंटच्या गट्टू ने गाडीची तोडफड करत दिली धमकी

0
192

काळेवाडी, दि. १८ (पीबीबी) – शिवीगाळ का करतोस असे हटकले म्हणून मित्रानेच सिमेंटच्या गट्टू ने दुचाकीची तोडफोड करत मित्राला गट्टू फेकून मारला. हा प्रकार सोमवारी(दि.17) काळेवाडी येथे घडला.

याप्रकरणी सागर गौतम दिवार (वय 30 रा. काळेवाडी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दीपक दत्ता कांबळे (वय 24) व शंकर वसंत खलसे (वय 32) दोघे राहणार थेरगाव यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे फिर्यादीचे ओळखीचे आहेत. सोमवारी फिर्यादी व त्यांचा मित्र विशाल गोवेकर हे गप्पा मारत थांबले असताना आरोपी दारूच्या नशेत तेथे आले व मोठमोठ्याने शिवीगाळ करू लागले. यावेळी फिर्यादी यांनी त्यांना शिविगाळ का करताय म्हणून हटकले. याचा राग येऊन आरोपीने सिमेंटचा गट्टू घेऊन फिर्यादीच्या दुचाकी वर मारत गाडीचे तोडफोड केली तसेच तो गट्टू फिर्यादी यांनाही फेकून मारला. यावेळी फिर्यादी यांनी तो चुकवला म्हणून ते थोडक्यात वाचले. आरोपींनी शिवीगाळ करत फिर्यादी यांना धमकी दिली यावरून वाकड पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.