हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत चिंचवड मधून भाऊसाहेब भोईर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
105

कै. सोपानराव भोईर यांना स्मरण करून चिंचवड विधानसभेतून भाऊसाहेब भोईर यांचा अपक्ष अर्ज दाखल

चिंचवड, दि. 29 (पीसीबी) : सकाळी वडील कै. सोपानराव भोईर (आप्पा) यांच्या भोईर नगर येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, क्रांतिवीर चापेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून पुढे मंगलमूर्ती वाडा येथे जाऊन श्री मोरया गोसावी यांचे दर्शन घेऊन पुढे काळभैरवनाथ मंदिर व धनेश्वर मंदिर तसेच शहरातील महापुरुषांना अभिवादन करत शेकडोंच्या संख्येने रॅली काढत दळवी नगर, चिंचवड गाव अशा नियोजित मार्गाने २०५-चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महापालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालय, येथे जाऊन उमेदवारी अर्ज भरला.

यावेळी कन्या मानसी गौरव घुले-भोईर, मा. नगरसेवक गणेश लोंढे, श्री हनमंत माळी, श्री संतोष पाटील इत्यादी तसेच मोठ्या संख्येने महिला, कार्यकर्ते सहकारी मित्र उपस्थित होते.