हजरत मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त रविवारी मौलाना अहमद नक्शबंदी यांचे मार्गदर्शन : युसुफ कुरेशी

0
325

– पिंपरी चिंचवड मधील नागरिकांनी जुलूस मध्ये उस्फुर्त सहभागी व्हावे

पिंपरी, दि. ७(पीसीबी) हजरत महंमद पैगंबर साहेब यांचा १४४५ वा जयंती उत्सव यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त रविवारी ( दि.९) सायंकाळी सात वाजता पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथे आयोजित केलेल्या सभेत अहमदाबादचे ज्येष्ठ मौलाना अहमद नक्शबंदी आणि पिंपरी चिंचवड मधील मौलाना मार्गदर्शन करणार आहेत. या उत्सवात नागरिकांनी उस्फूर्त सहभागी व्हावे असे आवाहन पिंपरी चिंचवड जुलूस कमिटीचे अध्यक्ष युसुफ कुरेशी यांनी केले आहे.

युसुफ कुरेशी यांनी सांगितले की, जुलूस मध्ये सहभागी होण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील विविध पाच विभागातून मिरवणुका निघणार आहेत. यामध्ये दापोडी, कासारवाडी, फुगेवाडी विभाग; काळा खडक, वाकड, काळेवाडी, पिंपरी कॅम्प विभाग; निगडी आकुर्डी चिंचवड विभाग; कुदळवाडी, जाधववाडी, घरकुल विभाग; भोसरी दिघी, बालाजी नगर, नेहरूनगर विभाग या परिसरातील नागरिकांसह शहरातील ७० ते ८० मुस्लिम युवक मंडळाचे पदाधिकारी, सभासद सहभागी होणार आहेत. सभेच्या स्थळी महिला व मुलांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था केलेली आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे धार्मिक उत्सव साजरे करण्यात आले नाही. यावर्षी सरकारने परवानगी दिल्यामुळे जुलूस मध्ये शांततेत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष युसुफ कुरेशी यांनी केले
आहे.