हगवणे मुळे फॉर्च्युनर जातीला लोकांनी धु धु धुतलय…

0
26

दि. २ , राज्यात वैष्णवी हगवणे आत्महत्या आणि हुंडाबळी प्रकरण प्रचंड चर्चेत आहे. लग्नामध्ये हुंडा म्हणून फॉर्च्यूनरही घेतली होती. या प्रकरणानंतर हुंड्यात मिळालेली गाडी घेऊन रुबाब दाखवणारे म्हणत हगवणे कुटुंबावर प्रचंड टीका होत आहे. अशातच, काही दिवसांपूर्वी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना मिळालेल्या फॉर्च्युनरवर आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळं फॉर्च्युनर या गाडीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोनच बदलला आहे. दरम्यान, सोलापूरमधील एका फॉर्च्यूनर मालकाने आपल्या गाडीवर लिहलेल्या मजकूराने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

“रोखीत विकत घेतलेली माझी घरची राणी….” असं म्हणत करमाळ्याच्या अतुल खूपसे यांनीफॉर्च्युनर वापरणाऱ्या गाडी मालकांकडे सध्या संशयान पाहण्याऱ्यांना उत्तर दिलं आहे. हगवणे प्रकरणानंतर फॉर्च्युनर या गाडीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोनच बदलला आहे. फॉर्च्युनर वापरणाऱ्या गाडी मालकांकडे सध्या संशयान पाहिलं जात आहे. त्यामुळं खूपसे यांनी मोठा निर्णय घेत स्वतःच्या गाडीवर भलामोठ मजकुर लिहिला आहे.

नेमका काय आहे मजकूर?

‘तशी तर मी मोठ्या घरची राणी.. मात्र बदनाम केलं मला हगवणे यांनी. मी फॉर्च्युनर,माझा रुबाबच वेगळा,हगवणे कुटुंबामुळे नाव ठेवू लागलाय गाव सगळा. अतुल भाऊंनी मला रोखीत विकत घेतलय, पण हगवणे मुळे फॉर्च्युनर जातीला लोकांनी धु धु धुतलय…’ खूपसे यांच्या फॉर्च्यूनर गाडीवरील मजकूर सध्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंडिंग होत आहे.

सर्वसामान्यांना, शेतकऱ्यांना फॉर्च्युनर गाडी घ्यायची तर दोन तीन वर्ष पैसे जमा करायचे किंवा बँकेचे लोन काढावे लागते. एवढी चांगली हगवणे कुटुंबामुळे ही गाडी बदनामी झाली. कुठेही गेलो हॉटेलवर जेवायला थांबलो तरी विचारतात तुमची आहे का सासऱ्यांनी दिली? त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबात मुली दिल्या तर अशी प्रकरणे होणार नाहीत, असे अतुल खुपसे यांनी म्हटले आहे.