स्व पै.अंकुशराव लांडगे किताबासाठी पै. पृथ्वीराज पाटील विरूद्ध पै.हर्षद सदगीर सामना

0
390

भोसरी, दि. ६ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड ! महाराष्ट्रात आता कुस्ती दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालली आहे. तालमीत तयार झालेले महाराष्ट्राचे पैलवान आता देशपातळीवरही कुस्ती स्पर्धा गाजवू लागले आहेत. यातच आता भोसरी गावच्या भैरवनाथ महाराज उत्सवानिमित्ताने भोसरी येथे कुस्त्यांचा जंगी आखडा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी भोसरीमध्ये प्रथमच दोन महाराष्ट्र केसरी लढणार असुन हा कुस्तीचा थरार येत्या रविवारी ९ एप्रिल रोजी कुस्तीप्रेमींना पाहता येणार आहे.

स्व पै.अंकुशराव लांडगे किताबासाठी पै. पृथ्वीराज पाटील विरूद्ध पै.हर्षद सदगीर असा सामना रंगणार आहे. पै.पृथ्वीराज पाटील हा २०२१ चा महाराष्ट्र केसरी बनला तर त्याआधी पै. हर्षद सदगीर यांनी २०१९ साली महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला आहे. विजेत्याला २ लाख आणि पै. श्री नामदेव किसनराव लांडगे यांच्याकडून मानाची गदा दिली जाणार आहे.

दरम्यान, येत्या ९ एप्रिल, रविवारी सायंकाळी ६ वाजता भोसरी गाव, कुस्ती आखाडा, गावजत्रा मैदान, भोसरी याठिकाणी ही स्पर्धा होणार आहे. जनसेवक रवि बाबासाहेब लांडगे व मित्र परिवार तर्फे या निकाली कुस्तीचे आयोजन करण्यात आले आहे.