स्वीप व्यवस्थापन कक्ष

0
226

दि 2 एप्रिल (पीसीबी )- निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपमार्फत मतदान जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत.
३६ शिरूर लोकसभा मतदारसंघा अंतर्गत २०७ भोसरी विधानसभेच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका क क्षेत्रीय कार्यालयाच्या पथका मार्फत मतदार जनजागृती उपक्रम राबविण्यात येत असून आज चिखली येथील मजूर अड्डा परिसरात मतदान करण्याविषयी जनजागृती करण्यात आली.
मोठ्याप्रमाणावर मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे अवाहन कामगारांना करण्यात आले.तसेच उपस्थित शेकडो कामगारांनी मतदानाची शपथ घेतली .
पिंपरी चिंचवड महागरपालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे व सहाय्यक आरोग्य अधिकारी तानाजी दाते यांचे मार्गदर्शनाखाली व २०७ भोसरी मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रेवणनाथ लबडे यांच्या नेतृत्वात स्वीप उपक्रमा अंतर्गत प्रथमताच मजूर अड्डा परिसरात मतदार जागृती करण्यात आली.यावेळी उपस्थित सर्व कामगार यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला
२०७ भोसरी विधानसभा मतदार संघांतील चिखली येथील मजूर अड्ड्यावर क क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने मतदार जागृती करण्यात आली व शपथ घेण्यात आली