स्वाती मोहोळ यांचा अत्यंत खळबळजनक आरोप

0
1358

-माझा नवरा वाघ होता, हिंदुत्ववादी होता म्हणूनच हत्या झाली

मुंबई, दि. ८ (पीसीबी) -| पुण्यात भरदुपारी गुंड शरद मोहोळवर गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर जखमी झालेल्या शरद मोहोळला रूग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र या गोळीबारात शरद मोहोळचा मृत्यू झाला. पुण्यात भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजली होती. यानंतर या प्रकरणातील आरोपींचा शोध देखील घेण्यात आलाय. आता शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

स्वाती मोहोळ यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. यामुळे खळबळ माजली आहे. माझा नवरा हा हिंदुत्ववादी होता, त्यामुळेच त्याची हत्या झाली असल्याचा आरोप शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी केला आहे.
स्वाती मोहोळ या पुणे भाजपच्या पदाधिकारी आहेत. स्वाती मोहोळ यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. यावेळी शरद मोहोळ यांच्या खुन्यांवर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी स्वाती मोहोळ यांनी केली आहे.
दरम्यान, शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ या भाजपच्या पुणे शहर महिला आघाडीच्या सरचिटणीस आहेत. स्वाती मोहोळ यांनी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत एप्रिल 2023 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. स्वाती मोहोळ यांच्या भाजप पक्ष प्रवेशानंतर शरद मोहोळ राजकारणात एन्ट्री करणार अशीही चर्चा होती. पण त्या आधीच त्याची हत्या करण्यात आली.

शरद मोहोळने शुक्रवारी त्याच्या पत्नीसोबत वाढदिवस साजरा केला. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मात्र आता शरद मोहोळ याच्या हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी साहिल पोळेकर असल्याचं आता स्पष्ट झालंय. आठ आरोपींपैकी दोन वकिलांचा देखील या हत्येमध्ये सहभाग आहे. शरद मोहोळ याची हत्या वैमनस्यातून आणि जमिनीच्या वादातून झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलंय. अजूनही या प्रकरणात मोठे खुलासे होऊ शकतात.

नितेश राणे यांची भेट –
दरम्यान, या सर्व घडामोडी दरम्यान आज भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी सुतारदारा येथील शरद मोहोळ यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी स्वाती मोहोळ यांच्याशी त्यांनी चर्चा देखील केली. त्यावेळी स्वाती मोहोळ म्हणल्या की, माझ्या राज्य सरकार आणि प्रशासनावर पूर्णपणे विश्वास आहे. माझी पती हिंदुत्ववादाच काम करतात. त्यामुळे ही घटना घडली आहे. समोरच्याला जर वाटत असेल की, असे करून मी खचून जाईल. त्यामुळे मी त्यांना एकच सांगू इच्छिते की, मी हिंदुत्ववाद्याची बायको आहे. माझा नवरा वाघ होता आणि मी त्याची वाघीण आहे. तसेच मला जोपर्यंत मरण येत नाही. तो पर्यंत हिंदुत्ववादासाठी लढत राहणार असल्याची भूमिका यावेळी त्यांनी मांडली