पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड येथील गरवारे टेक्निकल फायबर कंपनी व कामगार संघटनेच्याच्या वतीने रविवार दिनांक 21 रोजी “स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा” निमित्ताने सिंहगडावर वृक्षारोपण करण्यात आले. गेली अनेक वर्षे गरवारे कंपनी, व गरवारे निसर्गप्रेमी ग्रुपच्या” वतीने वेगवेगळ्या ठिकाणी व गड किल्ल्यावर वृक्षारोपण व वृक्ष सवंर्धन असे उपक्रम राबवण्यात येत असतात.
दिघी येथील दत्तगड, देहूरोड येथील घोरडेश्वर,भंडारा डोंगर दुर्गा टेकडी व जवळपासच्या अनेक ठिकाणी व्यवस्थापन,संघटना व गरवारे निसर्गप्रेमी ग्रुप दरवर्षी नियमितपणे वरील उपक्रम घेऊन प्रदूषण व पर्यावरण समतोल राखण्यासाठी खारीचा वाटा उचलण्यात येत असतो. सिंहगडावर राबवण्यात आलेल्या वृक्षारोपण मोहिमेत चिंचवड व वाई प्लांट मधील कामगार कर्मचारी व कुटुंबीय अशा दीडशे जणांनी सहभाग घेतला.
या वेळी ऑक्सिजनची निर्मीती करणाऱ्या,करंज,पिंपळ,चिंच कडुलिंब,सिल्व्हर ओक,बकुळी अशा विविध झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले, यासोबत गडाच्या पायथ्याशी व गडावर प्लास्टिक कचरा एकत्र करून स्वच्छताही करण्यात आली. कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक प्रबोध कामत व श्री विवेक कुलकर्णी यांनी “प्रत्येकांनी एक तरी झाड लावून त्याचे व्यवस्थित संवर्धन व संगोपन केले पाहिजे” असे सांगितले.
गडावरील रिमझिमनारा पाऊस, दाट धुके व निसर्गसौन्दर्याचा आनंद घेत, गरवारे कुटुंबीयांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत एकूण 75 झाडांचे वृक्षारोपण केले. भारतमाता कि जय,व छत्रपती शिवाजी महाराज कि जय या घोषणांनी गडावरील अवघे वातावरण भारावून गेले.
कंपनीतील वरिष्ठ व्यवस्थापन अधिकारी प्रबोध कामत, विवेक कुलकर्णी , राजेंद्र शिवराईकर, रावेंद्र मिश्रा, संजय पाटील, विलास आरेकर, गणेश भोसले, डी व्ही कुलकर्णी, राहुल बारवकर, निशांत जाधव तसेच कामगार संघटनेचे अध्यक्ष जयवंतराव खाटपे,उपाध्यक्ष राजेंद्र आढाव,खजिनदार संजय गायकवाड,सदस्य नितीन झेंडे, प्रवीण डावरे व निसर्गप्रेमी ग्रुपचे शाम कुंभार,शेखर गाडे,नंदेश पालांडे,सोमनाथ पुजारी, वसंत चव्हाण, गणपत शिरसाट,इतर कामगार, कर्मचारी व कुटुंबीय या सगळ्यांनी मोठ्या संख्येनी या उपक्रमात सहभाग घेतला.