स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या बलिदानाचे स्मरण करणे हीच त्यांना दिलेली खरी श्रद्धांजली – शत्रुघ्न काटे.

0
192

पिंपरी,दि.१६(पीसीबी) – मंगळवार दि.१५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याचा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या स्वातंत्र दिवसानिमित्त श्री.शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या हस्ते पिंपळे सौदागर रहाटणी परिसरातील शाळामध्ये तसेच सोसायट्यांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले आणि हा स्वतंत्रता दिवस खूप जल्लोषात आणि देशभक्तीच्या भावनेने साजरा करण्यात आला.

यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले कि “१५ ऑगस्ट १९४७ ही भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलेली तारीख आहे . इंग्रजांच्या दीडशे वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन आपण स्वतंत्र भारताचे नागरिक बनलो तो दिवस म्हणजेच १५ ऑगस्ट १९४७ होय. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी , थोरांनी , समाजसुधारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी लढा दिला, अनेकांनी ब्रिटिशांच्या अत्याचारांना तोंड दिले,अनेक शहीद झाले,अनेकांनी हसतमुखाने फासावर चढले आणि आपले आयुष्य देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संपवले तर अनेकांनी या स्वातंत्र्यासाठी आपले संपूर्ण तारुण्यची बाजी लावून हे स्वातंत्र्य खेचून आणले.”