प्राधिकरण, दि. १८ (पीसीबी) – दिवाळीचा आनंद सामुदायिक रित्या, कृतीशील उपक्रमातून व्दिगुणीत करतानाच छत्रपती शिवरायांचा इतिहास, ऐतिहासिक ठेवा असलेले किल्ले यांचाही अभ्यास करण्यास प्रवृत्त व्हावे यासाठी दरवर्षीप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या निसर्ग मित्र विभागातर्फे घरोघरी किल्ले बनवा स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचे कार्यक्षेत्र निगडी, यमुनानगर, आकुर्डी, रावेत (प्राधिकरण), शाहूनगर, संभाजीनगर या परिक्षेत्रापुरते मर्यादित आहे.
किल्ला काल्पनिक नसावा. कोणत्याही किल्ल्याची, गडाची प्रतिकृत आवश्यक आहे. किल्ल्यासाठी पर्यावरण घातक साहित्य वापरु नये (प्लास्टर ऑफ पॅरीस, प्लास्टीक, थर्माकॉल), परिक्षमाच्या वेळी संबंधित किल्ल्यावरील ऐतिहासिक घटना, भौगोलिक स्थान, वैशिष्ट या विषयी माहिती विचारली जाईल. किल्ल्याचा आकार, सुबकता, स्वच्छता, पर्यावरण पूरकता या बाबी परिक्षणाच्या वेळी विचारात घेतल्या जातील. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. 50 रुपये फी भरुन 21 ऑक्टोबर 2022 पूर्वी नाव नोंदणी करावी लागणार आहे. परिक्षक मंडळ 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत परिक्षणासाठी येईल.
परिक्षकांचा निर्णय अंतिम राहिल. प्रथम क्रमांकाचे 1 हजार 500, द्वितीय 1 हजार आणि तृतीय 750 रुपयांचे बक्षीस राहिल. उत्तेजनार्थ आकर्षत भेट वस्तू देण्यात येणार आहे. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी विजय सातपुते 9423573294, दिपक नलावडे 9850842471 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.