स्वस्त दरात सिमेंट विक्रीच्या बहाण्याने व्यावसायिकाची फसवणूक

0
326

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – एका व्यावसायिकाला स्वस्त दरात सिमेंट देण्याचे आमिष दाखवून त्यासाठी पैसे घेत व्यावसायिकाला सिमेंट न देता फसवणूक करण्यात आली. ही घटना पिंपरी येथे घडली.

महेश अर्जुनदास बक्षाणी (वय 50, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कल्याण (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महेश यांना फोन केला. अल्ट्राटेक कंपनीचे सिमेंट स्वस्त दरात देतो, असे त्याने फिर्यादीस सांगितले. त्यासाठी ऑर्डर घेऊन त्यांच्याकडून बिल देखील मागवून घेतले. त्या बिलापोटी फिर्यादीकडून आरोपीने 2 लाख 17 हजार रुपये घेतले. त्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारे सिमेंट न पाठवता तसेच घेतलेले पैसे परत न देता त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.