पिंपरी दि,१४ (पीसीबी) : सध्या महागाई दिवसेंदिवस वाढतच आहे. देशातील पेट्रोलच्या किंमतीने 100 चा आकडा केव्हाच पार केला आहे. या महागाईच्या काळात सर्वसामान्यांच्या खर्चात वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीने भरच घातली आहे. या वाढणाऱ्या महागाईच्या काळात अनेक ऑटो कंपन्यांकडून आता इलेक्ट्रिक गाड्या लाँच केल्या जात आहेत. या गाडयांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद देखील मिळतो आहे. अशातच आता टाटाने आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असलेली Tata Tiago EV लाँच केली आहे.
हे लक्षात घ्या कि, सोमवारी (10 ऑक्टोबर) रोजी टाटा मोटर्सकडून Tata Tiago EV साठी बुकिंग सुरू करण्यात आले होते. या एकाच दिवसात कंपनीला तब्ब्ल 10 हजार गाड्यांसाठी बुकिंग मिळाले. तसेच बुकिंग सुरू होताच वेबसाइटवर इतक्या संख्येने लोकांनी बुकिंग सुरु केले कि, त्यामुळे कंपनीची वेबसाइटच डाउन झाली. मात्र, काही वेळानंतर ती पुन्हा सुरु करण्यात आली. Tata Tiago EV ची किंमत 8.49 लाख रुपयांपासून ते 11.79 लाख रुपयांपर्यंत आहे. मात्र ही किंमत फक्त सुरुवातीच्याच 10 हजार ग्राहकांसाठी होती. आता यासाठी मिळालेला प्रतिसाद पाहून कंपनीकडून ती आणखी10 हजार ग्राहकांसाठी देखील वाढवण्यात आली आहे.
या ऑफर विषयी सांगताना टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स लिमिटेड आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक असलेले शैलेश चंद्र म्हणाले कि, ” Tata Tiago EV ला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे आम्हांला खूप आनंद झाला आहे. ज्यामुळे आता आम्ही ही इंट्रोडक्टरी प्राइस आणखी 10,000 ग्राहकांसाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.” ग्राहकांना या गाडीसाठी 21,000 रुपयांमध्ये डीलरशिपमध्ये आणि ऑनलाइन बुकिंग करता येईल.”
गाडीच्या फीचर्स विषयी जाणून घ्या
या गाडीमध्ये 24kWh बॅटरी पॅक मिळेल. तसेच पूर्ण चार्ज करून ती 315KM धावेल. याशिवाय, 19.2kWh चा बॅटरी पॅक देखील मिळेल, जो अंदाजे 250 किमी धावेल. तसेच ही गाडी 5.7 सेकंदात 0 ते 60 किमी प्रतितास स्पीड देऊ शकते असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. याशिवाय यामध्ये लाँग रेंज व्हर्जनची मोटर 55kW किंवा 74bhp पॉवर आणि 115Nm टॉर्क जनरेट करेल तर शॉर्ट रेंज व्हर्जनची मोटर 45kW किंवा 60bhp पॉवर आणि 105Nm टॉर्क जनरेट करेल. Tata Tiago EV
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://tiagoev.tatamotors.com