स्वराज्य मित्र मंडळातर्फे आयोजित रक्तदान शिबिर संपंन्न

0
435

वडगाव मावळ,दि.०५(पीसीबी) – स्वराज्य मित्र मंडळ, वडगाव मावळ व पोटोबा महाराज देवस्थान यांनी यावर्षी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये ५० रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले.

सर्व रक्तदात्यांना स्टीलचे थर्मास गिफ्ट म्हणून देण्यात आले. या शिबिरा दरम्यान स्वराज्य मित्र मंडळातील सभासद श्री पिंटू नवघणे यांचा मोफत आरोग्य विमा काढण्यात आला व मावळचे लोकप्रीय आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या हस्ते देण्यात आला.

तसेच शिवराज रोडवेज मालक मच्छिंद्र गाडे यांनी अनंता कूडे (विश्वस्त) यांच्याकडे दत्त मंदीर जीर्णोदधारसाठी वर्गणी धनादेशाद्वारे जमा केली. यावेळी स्वराज्य मित्र मंडळाचे यावर्षीचे अध्यक्ष पवन दंडेल, उपाध्यक्ष मच्छिंद्र गाडे, महेश ठोंबरे, प्रतीक भोसले, कर्याधक्ष समीर ढोरे व खजिनदार नवनाथ भोसले, प्रनाल निंबकर, सुमित भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. अमोल ठोंबरे यांनी सूत्रसंचालन केले.