स्वयंघोषित भाईंची मोहननगर मध्ये दहशत

0
47

पिंपरी, दि. 07 (पीसीबी) : स्वयंघोषित भाईंनी गुरुवारी (दि. ५) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास मोहननगर, चिंचवड येथे शस्त्राचा धाक दाखवत दहशत निर्माण केली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सुमित कमलाकर दाभाडे (वय २१), अक्षय राजू कापसे (वय २०, दोघे रा. चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह सोन्या काळे, प्रतीक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला मोहननगर येथे शतपावली करत असताना आरोपी दोन दुचाकींवरून मोठमोठ्याने हॉर्न वाजवत कोयते फिरवत आरडाओरडा करत आले. ‘इथला भाई आम्हीच आहे. आमच्याशी भिडण्याची कोणाची हिम्मत नाही. कोणी आडवा आला तर डायरेक्ट ३०२’ असे म्हणत दहशत निर्माण केली. आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून महिलेला जीवे मारण्याची धमकी देत कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादी महिलेच्या भाचीच्या अंगावर दुचाकी घातली. फिर्यादी आणि त्यांची भाची तिथून पळून गेल्या. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.