स्वयंघोषित डॉन लोकांची भुरटेगिरी; कपड्यांच्या दुकानात ट्रायलसाठी घातलेले कपडे पिस्तुलाचा धाक दाखवत पळवले

0
128

चिखली, दि. 12 जुलै (पीसीबी) – दुकानात ट्रायलसाठी घातलेले नवीन कपडे पिस्तुलाचा धाक दाखवून तिघांनी फुकट नेले आहेत. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चिखली मोरेवस्ती येथील रॉयल एस के मेन्स वेयर या दुकानांमध्ये बुधवारी (दि.10) घडली.

याप्रकरणी कापड व्यावसायिक प्रफुल्ल मधुकर कांबळे (वय 30 रा चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी तीन अनोळखी इसमावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे चिखली येथील अष्टविनायक चौक परिसरात रॉयल एस के मेन्स वेयर नावाचे कपड्याचे दुकान आहे. यामध्ये आरोपी बुधवारी सकाळी आले. त्यांनी दुकानात कपडे खरेदी करणार असल्यास सांगितले, फिर्यादीनी त्यांना कपडे दाखवले. यावेळी ट्रायल रूम मध्ये एकाने जाऊन शर्ट व पॅन्ट अंगात घातला. मात्र बाहेर येऊन ते तसेच जात होते. यावेळी फिर्यदिने. त्यांना कपड्याच्या पैशासाठी हटकले असता त्यांनी कमरेला लावलेले पिस्टल बाहेर काढून फिर्यादीवर रोखले. फिर्यादी यांना , आता तुला खलास करून टाकतो, आम्ही पैसे देत नाही आम्ही इथले डॉन आहोत. आम्ही नायर कॉलनी मध्ये मर्डर केला आहे तुला जिथे जाऊन तक्रार करायची असेल तिथे कर. अशी धमकी दिली. तसेच चार हजार रुपयांचे कपडे जबरदस्ती घेऊन गेले आहेत. यावरून चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.