मनसेच्या पाठपुराव्यांतर प्रशासनाला आली जाग
पिंपरी: चुकीच्या पद्धतीने आकारण्यात आलेला टॅक्स मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली आहे. झालेली चूक दुरुस्त करून नियमानुसारच कर आकारणी करण्यात येईल असे आश्वासन ‘कर आकारणी’ विभागाकडून देण्यात आल्याने सोसायटीतील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चिखली विभागातील स्वप्नपूर्ती रेसिडेन्सी या सोसायटीतील रहिवाशांनी सोसायटीच्या कर आकारणी संदर्भात मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्याकडे तक्रार केली होती. यानुसार, मनसेचे शहर सचिव मनोज लांडगे, मनसेचे भोसरी विधानसभेचे उपविभाग अध्यक्ष सत्यम पत्रे, शाखा अध्यक्ष चेतन कुलकर्णी तसेच सोसायटीतील सभासदां समवेत पिंपरी महापालिकेचे करा आकारणी विभागाचे प्रमुख निलेश देशमुख यांची भेट घेतली.यावेळी सोसायटीच्या कर आकारणी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. सन- २०१९ पासून करण्यात आलेली ‘कर आकारणी’ रद्द करून वीज पुरवठा करण्यात आलेल्या दिवसापासून (दि.१८/११/२०२३) पासून कर आकारणी करण्यात येईल. इंडेक्स-२ मध्ये जर पार्किंग नसेल तर त्याचा टॅक्स लागणार नाही. सोसायटी धारकांना आलेल्या टॅक्स पावतीवर जर SQ. Ft जास्त लागलेले असेल अशांना इंडेक्स-२ नुसार जो एरिया असेल, त्यानुसार टॅक्स लावला जाईल. कर पावतीवर सदनिका धारक व भोगवाटाधारकांच्या नावाची नोंद करण्यासाठी वीज बिल, इंडेक्स-२, टॅक्स पावती या सर्व कागदपत्राच्या झेरॉक्स प्रती या कार्यालयाकडे दि.१६ सप्टेंबर पर्यंत जमा कराव्यात, असे आवाहन निलेश देशमुख यांनी केले.