चिंचवड ता ९ : युवकांनो शिक्षणाचा आनंद घ्या. हे जीवन पुन्हा आयुष्यात मिळणार नाही. चिकित्सक राहून अभ्यास करा , उद्या स्पर्धा परीक्षेच्या द्वारे तहसीलदार, जिल्हाधिकारी झालात ! तर तुमच्या एका सहीने गावाचे, शहराचे भाग्य बदलेल. कोणत्याही क्षेत्रात जावा, आवडत्या क्षेत्रात कार्यरत रहा. आई-वडिलांना हेवा वाटेल असे काम करा. लक्षात ठेवा आधुनिक तंत्रज्ञानामुळे जग आता एक खेडे झाले आहे .त्यासाठी कौशल्य आत्मकेंद्रीत करा. ही पाच-दहा वर्ष शिक्षणासाठी झोकून द्या त्यासाठी अचूक कौशल्य आत्मसात करा ,अभ्यास करा व आपले भविष्य बदला . स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी स्वतःला सिद्ध करण्यासाठी अपेक्षित अचूक ज्ञान आत्मसात करा. आज तुम्ही स्वतःत बदल घडवून आणला नाही तर भविष्यात टिकू शकणार नाही. याची जाणीव सतत ठेवा. नाविण्याचा स्वीकार करा. आता काळ बदलला आहे त्याप्रमाणे स्वतः बदल करा. आपल्या आयुष्याला आपण कोठे घेऊन जायचे आहे ? आपल्या जगण्याची नेमकी दिशा काय असावी ? हे ठरवण्याची हीच अचूक वेळ आहे. पालकांना उद्देशून म्हणाले, मुलामुलींबरोबर मोकळा संवाद असला पाहिजे. त्यांना वेळप्रसंगी धाकही वाटला पाहिजे. प्रासंगी कौतुकाची छाप टाका . लहान मुलाना मोबाईल पासून दूर ठेवा. चांगले आई-वडील होता येईल का ? याची काळजी घ्या .मुलांच्या गुणपत्रिकेतील गुणाची सूज म्हणजे तुमची गुणवत्ता नाही ,हे लक्षात ठेवा. गुणाच्या मागे धावू नका .शिक्षकांना उद्देशून ते म्हणाले , प्रत्येक विद्याथ्र्यात काहीतरी वेगळेपण आहे .त्याच्यात कमतरता काय आहे हे हेरून त्यांना अचूक ज्ञान व मार्गदर्शन करावे . विद्यार्थी कोणत्या क्षेत्रात चमक दाखवू शकेल, त्याच्यातील उनीवा काय हेरून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची आज काळाची गरज आहे. असे आवाहन प्रेरक व्याख्याते गणेश शिंदे यांनी चिंचवड येथील प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस च्या वतीने आयोजित प्रतिभा सृजन व्याख्यान मालिकेत विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत पालक व शिक्षकाची भूमिका या विषयावरील दुसरे पुष्प गुंफताना बोलत होते. त्याचा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले संस्थेचे संस्थापक , सचिव डॉ. दीपक शाह याच्याहस्ते शाल , पुष्पगुच्छ, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी संस्थेच्या अध्यक्षा प्रतिभा शहा , मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ . राजेंद्र कांकरिया , प्राचार्या डॉ क्षितिजा गांधी, डॉ वनिता कुऱ्हाडे ,डॉ पौर्णिमा कदम, एमबीएचे संचालक डॉ . सचिन बोरगांवे ,मुख्याध्यापिका डॉ . वृंदा जोशी, सोमाटणे येथील शाळेच्या मुख्याध्यापिका प्रा सुनिता फडके, समवेत पालक ,विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात डॉ दिपक शहा म्हणाले , विद्यार्थ्यांच्या व पालकांचे स्वप्न पूर्ण व्हावे .विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण येथे मिळावे यासाठी सातत्याने विविध स्तरावर वेगवेगळी उपक्रमे राबविण्यात येतात .शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात काय व्हायचेय ? या दृष्टीने त्यानी ध्येयप्राप्ती करून त्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ञा करवी मार्गदर्शन मिळावे यासाठी संस्थेच्या वर्धापण दिनाचे औचित्य साधून तीन दिवशीय व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे . यावेळी व्याख्यात्याचा भाषणाचा सारांश मनावर विद्यार्थ्यांनी कोरीन ठेवण्याची विनंती यावेळी त्यानी विद्यार्थ्याना केली.
. कार्यक्रमाची प्रस्तावना बीएडच्या प्राचार्या डॉ पौर्णिमा कदम यांनी केली. पाहुण्यांच्या परिचय डॉ गीता कांबळे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ .सुवर्णा गायकवाड यांनी केले.













































