स्वतःच्याच बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याने बॉलिवूड अभिनेता गोविंदा जखमी

0
101

मुंबई, दि. ०१ (पीसीबी) : बॉलिवूड अभिनेता गोविंदा जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. स्वतःच्याच बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याने गोविंदा जखमी झाल्याचे म्हटले जात आहे. या अपघातामध्ये गोविंदाच्या पायाला गोळी लागली. यानंतर त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. बंदूक ठेवत असताना हा अपघात घडला आहे. यावेळेस तो जुहू येथील त्याच्या निवासस्थानी एकटाच असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान गोविंदावर शस्त्रक्रिया करून त्याच्या पायातून गोळी बाहेर काढण्यात आली आहे, त्यामुळे त्याच्या जीवाला आता कोणताही धोका नाही. मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदाच्या डाव्या पायाला गोळी लागली आहे. गोळीबाराचा आवाज येताच घरामध्ये उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलीय. अंधेरीतील क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये गोविंदावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी जुहू पोलीस अधिक तपास करत आहेत. घटनेबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झाली नसल्याची पोलिसांनी दिली आहे. तसेच गोविंदाची प्रकृतीही स्थिर आहे.