स्वतःच्याच पेन्शनचे पैसे मागायला गेलेल्या सासऱ्याला सुन व तिच्या घरच्यांकडून मारहाण

0
365

देहूरोड,दि.३(पीसीबी): सुनेकडे असलेले स्वतःच्या पेन्शनचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या सासऱ्याला सून व तिच्या घरच्यांनी बेदम मारहाण केली आहे. ही घाटना देहूरोड येथील साईनगर परिसरात गुरुवारी (दि.2) घडली आहे.

याप्रकरणी सून, तिची आज्जी, आई, बहिण, भाऊ व इतर दोन ते तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. देहुरोड पोलीस ठाण्यात सासरे सुहास किसन गायकवाड (वय 60 रा. देहुरोड) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आर्मी मधून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या पेन्शनचे पैसे सूनेने फोन पे द्वारे काढून घेतले होते. ते पैसे मागण्यासाठी फिर्यादी गेले असता सून व तिच्या घरच्यांनी पैसै मागितले यावरून फिर्यादी यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच सुनेच्या बहिणीने लोखंडी रॉडने मारहाण केली. यावरून देहुरोड पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.