“स्वच्छ सन्मान सोहळा व स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ पूर्वतयारी” उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या होणार शुभारंभ

0
2

उद्या प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कार्यक्रम

दि. २२ (पीसीबी) : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वच्छ महाराष्ट्र/भारत अभियान (नागरी) अंतर्गत स्वच्छ सन्मान सोहळा व स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ ची पूर्वतयारी उपक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते होणार आहे. चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह शनिवार दि.२३ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली. 

या कार्यक्रमासाठी केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची विशेष उपस्थित राहणार आहे. तसेच खासदार मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, श्रीरंग आप्पा बारणे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार अरुण लाड, उमा खापरे, जयंत आसगावकर, योगेश टिळेकर, अमित गोरखे, दिलीप वळसे पाटील, भीमराव तापकीर, विजय शिवतारे, महेश लांडगे, राहुल कुल, बापूसाहेब पठारे, सुनिल कांबळे, चेतन तुपे, शरद सोनवणे, सिद्धार्थ शिरोळे, सुनिल शेळके, बाबाजी काळे, हेमंत रासणे, शंकर मांडेकर, शंकर जगताप, ज्ञानेश्वर कटके, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे तसेच माजी लोकप्रतिनिधी,पदाधिकारी व माजी नगरसदस्य,नगरसदस्याआदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

भारत सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घेतलेल्या “स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये पिंपरी चिंचवड शहर देशात ७ वे तर राज्यात प्रथम क्रमांकाचे शहर ठरले आहे. याशिवाय ७ स्टार कचरामुक्त शहर तसेच वॉटर प्लस मानांकन देखील शहराला मिळाले आहे.याबददल केंद्र शासनाच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिकेला पुरस्कार देऊन सन्मानित देखील केले आहे. या यशस्वी कामगिरीमध्ये सहभाग घेऊन योगदान देणाऱ्या नागरिक, लोकप्रतिनिधी, अनेक सेवाभावी संस्था, व्यक्ती, महापालिका अधिकारी कर्मचारी आदींचा महत्वपूर्ण सहभाग आहे. या सहभागाबद्दल प्रातिनिधीक स्वरुपातील त्यांचा सन्मान देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. तसेच यावेळी स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ पूर्वतयारीचा शुभारंभ देखील होणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.