पिंपरी दि. ११ (पीसीबी) – वर्गातील स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याने सातवीत शिकणारी विद्यार्थिनी जखमी झाली. ही घटना बुधवारी (दि. ११) दुपारी एकच्या सुमारास यमुनानगर, निगडी येथील एसपीएम शाळेत घडली. समृद्धी शेखर रुपवते (वय १३), असे जखमी झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यमुना नगर येथील एसपीएम शाळेतील वर्ग खोल्यांमध्ये पावसाचे पाणी गळत असल्याने स्लॅबवर वॉटरप्रूफिंगचे काम सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी सातवीच्या वर्गात स्लॅबच्या प्लास्टरचा काही भाग अचानक कोसळला. प्लास्टर समृद्धीच्या हातावर पडल्याने तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. समृद्धीला पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत खुळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
स्लॅबचे प्लास्टर कोसळले त्यावेळी वर्गातील सर्व विद्यार्थी मैदानावर गेले होते. समृद्धी रुपवते खेळाचा तास संपल्यानंतर सर्वात आधी दप्तर नेण्यासाठी वर्गात आली होती. त्यावेळी स्लॅबचा काही भाग कोसळून ती जखमी झाली