-तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांना “स्मार्ट आणि सक्सेसफुल सीईओ ऑफ द इयर” पुरस्कार
पिंपरी,दि.२६ (पीसीबी) : गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, स्मार्ट सिटीज कौन्सिल इंडियाच्या वतीने आयोजित “७ व्या स्मार्ट शहरीकरण २०२२” प्रदर्शनात पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीला सर्वांधित तीन “स्मार्ट एनर्जी, नागरी सहभाग आणि मोस्ट पॉप्युलर लीडरशिप” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सहारा स्टार, मुंबई येथे २६ रोजी स्मार्ट सिटी कौन्सिल इंडियाचे संस्थापक व कार्यकारी संचालक श्री. प्रताप पडोडे, महाराष्ट्र शासनाच्या प्रधान सचिव श्रीम. सोनिया सेठी, एलव्हीएक्स ग्लोबलचे संस्थापक अध्यक्ष श्री. कोरी ग्रे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. महानगरपालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंग यांच्यासह सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, कंपनी सेक्रेटरी चित्रा पंवार यांनी पुरस्कारांचा स्विकार केला. यावेळी, स्मार्ट सिटीचे सल्लागार प्रतिनिधी उपस्थित होते.
स्मार्ट सिटी कौन्सिल इंडियाला ७ वर्ष पूर्ण झाल्याने वॉशिंग्टन डीसी आणि ऑस्ट्रेलिया यांच्या सहकार्याने “७ व्या स्मार्ट शहरीकरण २०२२” भारताच्या स्मार्ट शहरांच्या प्रवासासाठी आव्हाने आणि उपाय शोधणे व व्यापार वाढीसाठी सरकारी, खाजगी क्षेत्र आणि व्यावसायिक यांची एकत्रित चर्चा होण्याकरीता या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
“लोकप्रिय लीडरशिप अवॉर्ड” या क्षेणीत तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांना “स्मार्ट आणि सक्सेसफुल एसपीव्ही सीईओ ऑफ द इयर” हा पुरस्कार मिळाला. ऑनलाइन मतदानाच्या आधारित हा पुरस्कार देण्यात आला. तसेच, शहराच्या प्रगतीमध्ये नागरिकांच्या सहभागाच्या क्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या आणि विकसित केलेल्या सर्वात नाविन्यपूर्ण आणि यशस्वी प्रकल्पासाठी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या “स्मार्ट सारथी सिटीझन इंगेजमेंट” या प्रकल्पाला “स्मार्ट आणि यशस्वी नागरिक सहभाग” पुरस्कार प्राप्त झाला. “स्मार्ट एनर्जी” या क्षेणीत “स्मार्ट सोलर एनर्जी” या प्रकल्पाला शाश्वत स्मार्ट एनर्जी सोल्यूशन्स डिझाइन आणि अंमलात आणण्याच्या प्रभावी पद्धतीला प्रोत्साहन दिल्याबददल पुरस्कार मिळाला.
सदर प्रदर्शनामध्ये, ५० हून अधिक वक्ते ५०० हून अधिक अधिकारी, राष्ट्रीय तज्ञ, जागतिक कंपन्या, धोरणकर्ते, वित्त पुरवठादार, तंत्रज्ञ, व्यावसायिक, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, आर्किटेक्ट, विकासक, नगर नियोजक आणि नागरिक संस्थांनी सहभाग घेतला होता. स्मार्ट सिटी विकसित जागतिक रणनीतींसाठी शहरांना पुरस्कार, त्यांच्या नागरिकांसाठी प्रकल्प, उपक्रम आणि धोरण अंमलबजावणी करण्यात येत आहे. स्मार्ट सोल्यूशन्सच्या क्षेत्रातील कामगिरी ओळखण्यासाठी, स्मार्ट सिटीज कौन्सिल इंडियाने भारतातील सर्वाधिक नागरिकांना लाभ देणार्या प्रकल्पांना पुरस्कार दिला. भारताच्या स्मार्ट सिटी मिशनमधून जन्माला आलेल्या या प्रकल्पांमुळे आपल्या देशातील पायाभूत सुविधांच्या वाढीला चालना मिळाली आहे. पायाभूत सुविधा क्रांतीमध्ये देशाला आघाडीवर ठेवले आहे. तंत्रज्ञानाच्या नाविन्यपूर्ण अनुप्रयोगांचे प्रदर्शन आणि नवकल्पना, समस्यांचे निराकरण करण्यासाठी, जोखीम कमी करण्यासाठी, समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि यशासाठी योजना करण्यासाठी नाविन्यतेला प्रोत्साहन देणारे प्रकल्प प्रदर्शित आणि पुरस्कृत करण्यास मदत होणार आहे