स्मशान भूमीतून दुचाकी चोरीला

0
252

सोमाटणे, दि. ८ (पीसीबी) – सोमाटणे येथील स्मशानभूमीतून दुचाकी चोरीला गेली. ही घटना मंगळवारी (दि. ७) दुपारी सव्वाएक वाजता घडली. विकास लक्ष्मण दडस (वय २२, रा. गहुंजे) यांनी याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दडस यांनी त्यांची १० हजार रुपये किमतीची दुचाकी सोमाटणे येथील पवना नदीच्या काठावर असलेल्या स्मशानभूमीत पार्क केली. दुपारी सव्वाएक वाजताच्या सुमारास त्यांची दुचाकी अज्ञातांनी चोरून नेली. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.