स्पा सेंटर वर धाड टाकत पोलीसांनी केली 3 पीडित तरुणीची सुटका…..

0
438

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – पिंपरी चिंचवडमधील रहाटणी परिसरातील मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पोलीसांनी केली आहे.

रोहन विलास समुद्रे (वय ३४, रा. ४७३ / २६६९ संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे) यांच्यासह एका महिलेविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणी परिसरातील शिवार चौक येथील रेनबो प्लाझामधील APPLE SPA शॉप नं. ५०७, पाचवा मजल्यावर वेश्याव्यवसाय सुरू होता.

रहाटणी येथे स्पाच्या नावाखाली काही दलाल स्वतःचे आर्थिक फायदयासाठी अवैध रित्या मुलींना जास्त पैशाचे अमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याचे माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी अचानक धाड टाकून वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. यावेळी दोन पीडित महिलांचा सुटका करण्यात आली. तर वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या रोहन समुद्रे यांच्या एक महिलेविरोधात वाकड पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ चे कलम ३, ४, ५ अन्वये गुन्हा करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.