स्पा सेंटर मध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

0
273

चाकण, दि. २० (पीसीबी) – चाकण येथे एका स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने पर्दाफाश केला. एका महिलेची सुटका करत स्पा चालक मालकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. १९) सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास करण्यात आली.

अनिल काळुराम आतकर (वय ३९, रा. राक्षेवाडी, ता. खेड) असे अटक केलेल्या स्पा चालक मालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक गणेश कारोटे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेठाण चौक चाकण येथे ओर्चीड स्पा मध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई करत स्पा चालक मालकाला अटक केली. त्याने एका महिलेला पैशांचे आमिष दाखवून तिच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी पीडित महिलेची सुटका केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.