वाकड, दि. ६ (पीसीबी) – स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखा युनिट चारने छापा मारून कारवाई केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 5) दुपारी तीन वाजता मी टाईम स्पा, कस्पटे वस्ती, वाकड येथे करण्यात आली.
अजय अंकुश गवई (वय 20, रा. वाकडकर वस्ती, हिंजवडी), सचिन सुरेश भिसे (रा. काळेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मी टाईम स्पा या स्पा सेंटर मध्ये आरोपींनी तीन महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी प्राप्त केले. त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला आणि त्यातून मिळालेल्या पैशांवर आरोपींनी त्यांची उपजीविका भागवली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी स्पा सेंटरवर कारवाई केली. अजय गवई याला पोलिसांनी अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.










































