स्पाय कॅमेराच्या साहय्याने स्वतःच्या बायकोसोबतचे शरीर संबंधांचे व्हिडीओ

0
7

दि . २३ ( पीसीबी ) – वैष्णवी हगवणे प्रकरणात तिच्या सासरकडील मंडळीसोबत दोषी असणाऱ्या निलेश चव्हाणचे पितळ उघडं पडलं आहे. हगवणे कुटुंबाप्रमाणे चव्हाण यानेदेखील आपल्या पत्निचा अमानुष छळ केल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हे तर त्याने स्पाय कॅमेराच्या साहय्याने स्वतःच्या बायकोसोबतचे शरीर संबंधांचे व्हिडीओ काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यासंदर्भात 2019 मध्ये पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात चव्हाण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याच पोलीस ठाण्यात वैष्णवीचे बाळ मागण्यासाठी आलेल्या तिच्या माहेरच्या लोकांना पिस्तुलाच्या साहाय्याने धमकावल्याचा गुन्हा चव्हाणवर दाखल झाला आहे.

निलेश चव्हाणचे 3 जून 2018 मध्ये लग्न झालं. जानेवारी 2019 मध्ये निलेश चव्हाणच्या पत्नीला बेडरूममधील सिलिंग फॅनला काहीतरी संशयास्पद अडकवल्याचा संशय आला. तिने निलेशला याबद्दल विचारलं असता त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात निलेशच्या पत्नीला घरातील एअर कंडिशनला काहीतरी संशयास्पद अडकवल्याचा संशय आला. त्यावेळीही निलेशने उडवाउडवीची उत्तर दिली. त्यानंतर शंकेचे निरसन करण्यासाठी बायकोने त्याचा लॅपटॉप उघडला. त्यामध्ये त्यांच्या शरीर संबंधांचे व्हिडीओ स्पाय कॅमेऱ्याच्या साहाय्याने रेकॉर्ड केल्याचं तिला आढळून आलं. बेडरूममधील लाईट सुरु ठेऊन शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडत होता. त्या लॅपटॉपमध्ये निलेशच्या बायकोला त्याचे आणखी काही मुलींसोबतचे आक्षेपार्ह्य अवस्थेतील व्हिडीओ देखील आढळून आले. त्यानंतर बायकोने पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी 2019 मध्ये पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानतंर आता वैष्णवीचे बाळ मागण्यासाठी आलेल्या तिच्या माहेरच्या लोकांना पिस्तुलाच्या साहाय्याने धमकावल्याचा गुन्हा चव्हाणवर दाखल झाला आहे. वैष्णवी यांचा मुलगा हगवणे याने निलेश याच्याकडे दिला होता तेव्हा निलेश ने त्याच्याकडील पिस्तूल कस्पटे कुटुंबीयावर रोखली होती त्यामुळे वारजे पोलिस ठाण्यात आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती पोलिस उपआयुक्त संभाजी कदम यांनी दिली आहे.

निलेश चव्हाण याच्यावर हिंजवडी मध्ये ड्रिंक अँड ड्राइव्हची केस आहे. २००९ मध्ये सुद्धा निलेश चव्हाण याच्यावर वारजे पोलिस ठाण्यात अदखल पत्र गुन्हा दाखल आहे. निलेश याचे हगवणे यांच्यासोबत कौटुंबिक संबंध होता. आपल्याकडे जी तक्रार दिली आहे त्यावरून कलम लावले आहेत. असही पोलिस उपआयुक्त कदम यांनी यावेळी सांगितलं आहे.