स्पाईन रोड बाधित कुटुंबांना पर्यायी भूखंड वाटप..

0
263

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – गेल्या 10 वर्षांपासून रखडलेल्या स्पाईन रोड बधितांना पर्यायी भूखंड वाटपाला सुरू झाली आहे. आमदार महेश लांडगे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, सहायक आयुक्त प्रशांत जोशी यांच्या समक्ष दुय्यम नोंदणी कार्यालय 24, निगडी प्राधिकरण या ठिकाणी प्रातिनिधीक स्वरुपात 12 दस्त नोंदविण्यात आलेले आहेत. यापुढे इतर दस्त तातडीने नोंदविण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

दस्त नोंदणी सुरु झाल्यामुळे अनेक दिवसापासून बाधितांची गैरसोय झालेली दुर होणार आहे. ज्या बाधितांनी कागदपत्रांची पुर्तता केलेली नाही, त्यांनी तातडीने पुर्तता करुन देणेत यावी. जेणेकरू एकत्रितपणे सदर ठिकाणी विकासाची कामे करणे किंवा बांधकामाकरीता पुढील कामकाज करणेकामी सोयीचे होणार आहे. याबाबतही सर्वांना आवाहन करण्यात येईल, असे आमदार लांडगे म्हणाले.

मौजे तळवडे येथील त्रिवेणीनगर चौक येथून जाणा-या स्पाईन रस्त्यामधील बाधित रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी तत्कालीन नवनगर विकास प्राधिकरण कार्यालयाकडून पेठ क्र. 11 मधील निवासी जागेमधील 1 व 2 क्षेत्र अनुक्रमे 12059.72 व 2732.28 चौरस मीटर असे एकूण 14 हजार 784 चौरस मीटर क्षेत्र महापालिकेने बाधितांकरीता घेतलेले आहे. यामध्ये प्राधिकरणाने 132 भूखंडचा लेआऊट मंजूर केलेला आहे. लेआऊटमधील भूखंडांची सोडत तीन टप्प्यांमध्ये करण्यात आलेली आहे. यामध्ये बाधित झालेल्या ज्या व्यक्तींनी कागदपत्रांची पुर्तता केलेली आहे, त्यांच्या बरोबर भूखंडाचा दस्त नोंदविणेकामी प्राधिकरण कार्यालयाकडे पाठविण्यात आलेले आहेत.