स्पाईन रोडवर अपघात, पत्नी गंभीर जखमी

0
3

दि. 10 (पीसीबी) – पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना चारचाकी वाहनाने त्यांना पाठीमागून जोरात धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवर मागे बसलेली पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना बुधवारी (दि. ८) स्पाईन रस्त्यावर शरदनगर गल्ली नंबर ८ समोर घडली. संगिता शिंदे असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत पती श्रीकांत विठ्ठल शिंदे (वय ४७,रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, एमएच १४ एलएक्स ०९८१ या कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या पत्नी संगिता यांच्यासोबत दुचाकीवरून जात होते. स्पाईन रस्त्यावर आल्यानंतर चारचाकी वाहनाने त्यांना पाठीमागून धडक दिली. यामध्ये संगीता यांच्या डोक्याला मार लागून त्या गंभीर जखमी झाल्या.