स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मराठा-कुणबी आरक्षण रद्द करण्याची मागणी

0
372

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मराठा कुणबी जातीच राजकीय आरक्षण रद्द करावे या मागणीसाठी ओबीसी संघर्ष सेनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पिंपरी चिंचवड तहसीलदार अर्चना निकम यांच्या हस्ते पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आपण महाराष्ट्रामध्ये मराठा कुणबी नोंदी सापडण्याचा अध्यादेश काढला आहे त्यामुळे मराठा कुणबी नोंदी सापडविल्या जात आहेत.

कुठलीही खातरजमा न करता मोठ्या प्रमाणावरती मराठा समाज हा ओबीसी मध्ये येत आहे. मराठा / मराठा कुणबी हा समाज राजकीय व सामाजिक दृष्ट्या पुढारलेला समाज आहे हे सर्वोच्च न्यायालयामध्ये सिद्ध झाले आहे त्यामुळे ओबीसी मधील मराठा कुणबी या जातीचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण रद्द करण्यात यावे.

कारण ओबीसी मध्ये इतर 371 जाती आणखी सामाजिक व राजकीय दृष्ट्या प्रवाहात आलेल्या नाहीत. मराठा आणि कुणबी मराठा ही जात एकच आहे की वेगळी हे आपण जाहीर करावे. व सर्व समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी. आमच्या या मागण्या तातडीने मार्गी लावाव्यात अन्यथा मोठे आंदोलन उभं करण्यात येईल.असे ओबीसी संघर्ष पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाठ यांनी म्हटले आहे. यावेळी प्रदेश महासचिव सुरेश गायकवाड, तेली समाजाचे नेते अनिल राऊत, संतोष माळी, संतोष माळी, आनंदा कुदळे, एडवोकेट विद्या शिंदे, ज्योती परदेशी, सोमनाथ शेळके, विशाल जाधव, शैलेश फुलंब्री, रोहिणी रासकर, सुजाता विधाते,.आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.