स्टोअर मॅनेजरनेच केली एअरटेलची फसवणूक

0
433

भोसरी,दि.२६(पीसीबी) – एअरटेल कंपनीच्या स्टोअर मध्ये काम करणाऱ्या स्टोअर मॅनेजरने आर्थिक अफरातफर करून कंपनीची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार 22 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट या कालावधीत जय गणेश साम्राज्य नगर, भोसरी येथील एअरटेल स्टोअर मध्ये घडली.

नितीन युवराज घारगे (वय 32, रा. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या स्टोअर मॅनेजरचे नाव आहे. याप्रकरणी भारती एअरटेल कंपनीचे टेरिटरी मॅनेजर राजकिरण दत्ताराम साळुंखे (वय 39, रा. चऱ्होली बुद्रुक, पुणे) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भारती एअरटेल कंपनीचे जय गणेश साम्राज्य नगर भोसरी येथे एअरटेल स्टोअर आहे. त्यामध्ये आरोपी नितीन हा स्टोअर मॅनेजर पदावर काम करतो. कंपनीने त्याच्या ताब्यात दिलेल्या एअरटेल स्टोअर बँक खात्याचा लॉगइन आयडी आणि पासवर्डचा गैरवापर करून एक लाख 100 रुपये काढून घेतले. त्यानंतर जमा झालेल्या रोख रकमेतून 39 हजार 23 रुपये देखील काढून घेत कंपनीची एकूण एक लाख 39 हजार 123 रुपयांची फसवणूक केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.