स्टंटबाजी आली अंगलट, बारामतीत दोघांवर गुन्हाबारामतीत स्टंटबाजी करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

0
12

बारामती दि २९ (पी.सी.बी) : बारामती शहरातील एमआयडीसी परिसरात बेफाम चालवलेल्या दोन ‘स्टंट कारच्या’ व्हायरल व्हिडीओवरून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यादव यांनी चुकीच्या पद्धतीने वाहन चालवणाऱ्यांची माहिती कळवावी असे आवाहन व्हाट्सअप मेसेज द्वारे केले होते. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. बारामती एमआयडीसी परिसरातील पेन्सिल चौक ते गदीमा चौक या रहदारीच्या रस्त्यावर दोन चारचाकी वाहणांनी स्टंटबाजी करून स्वतःच्या अणि इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये एक टाटा पंच तर दुसरी पोलो गाडी असल्याचे दिसत होते. हा स्टंट जर चालकाच्या अंगलट आला असता तर यात अनेकांना जीवही गमवावा लागला असता. हा गुन्हा 25 जानेवारी रोजी घडला असल्याचे सिद्ध झाले तर 27 जानेवारीला टाटा पंच तसेच वोक्सवॅगन कंपनीच्या पोलो गाडीच्या वाहनचालकांवर बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयूर आव्हाड आणि तेजस मनोज कांबळे या स्टंटबाजी करणाऱ्यांचे विरोधात बेदरकारपणे वाहन चालविणे चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे