स्कॉर्पिओ गाडी तपासणीमध्ये 50 लाख रुपये रोकड

0
436

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत माननीय पोलीस आयुक्त यांचे आदेशान्वये लोकसभा निवडणूक 2024 अनुषंगाने एकूण नऊ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आलेली आहे. आज दिनांक 26 मार्च 2024 रोजी उर्से टोल नाका, मावळ लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी लावण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान, शिरगाव पोलीस स्टेशनचे पीएसआय शेख व त्यांचे टीम मार्फत वाहनांची तपासणी करत असताना एका महिंद्रा कंपनीच्या स्कॉर्पिओ गाडीच्या तपासणीमध्ये 50 लाख रुपये रोख रक्कम मिळून आली असून त्याबाबत योग्य खुलासा करता आला नाही. यास्तव सदरची रक्कम शिरगाव पोलीस स्टेशन मार्फतीने जप्त करण्यात आलेली असून पुढील योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.