स्कूलबसच्या धडकेत महिला जखमी

0
140

पिंपरी, दि. 13 (प्रतिनिधी)

स्कूल बसने धडक दिल्याने महिला गंभीर जखमी झाली. ही घटना सोमवारी (दि. 11) मध्यरात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास पीएमटी बस स्टॉप जवळ मोहननगर, चिंचवड येथे घडली.

दिपाली संदीप शहा (वय 48, रा. चिंचवड) असे जखमी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी संदीप हसमुखलाल शहा (वय 56) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी स्कूल बस चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पत्नी दिपाली शहा त्यांच्या पाळीव श्र्वानाला फिरविण्यासाठी मोहननगर येथून जात होत्या. मोहन नगर मधील पीएमटी बस स्टॉप जवळ आल्यानंतर त्यांना पाठीमागून एका स्कूलबसने धडक दिली. त्यामध्ये दिपाली यांच्या डोक्याला, हाताला, पायाला गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्यानंतर स्कूलबस चालक पळून गेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.